वार्ताहर/ साखरपा
संगमेश्वर तालुक्यातील पुर्ये गवळीवाडी येथे राजाराम काबदुले यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी 31 मार्च रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास ही आग लागली.
आग लागताच घरातील मंडळी तातडीने बाहेर पडल्याने कोणीही जखमी झाले नाही, मात्र यात मोठी आर्थिक हानी झाली आहे. अनिल काबदुले, विनायक काबदुले व अन्य ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मेहनत घेतली. या आगीत घरातील अनेक मौल्यवान वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने महावितरणकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.