आपण दुसऱयाला आनंद दिल्यास त्यातून निर्माण होणारी जगण्याची प्रेरणा आपल्याला नवीन ऊर्जा देते. त्यामुळे दैनंदिन जीवनात दुसऱयाला आनंद देण्यासाठी प्रयत्न करायला हवा. इतरांना निरपेक्षपणे मदत केल्यास हा आनंद नक्कीच मिळवता येऊ शकतो.
फारंच क्षुल्लक कारणासाठी उगाचच आपण दुसऱयाचा आनंद हिरावून घेतो असतो. केवळ हिरावूनच घेत नाही तर आपल्या कोत्या मनाचं दर्शनही घडवतो.
बाहेर मोठेपणाच्या, समाजसेवेच्या गप्पा करणारे अनेकदा आपल्या घरी मात्र इतक्मया क्षुल्लक गोष्टींसाठी आपल्या जवळच्या व्यक्तींना वेठीस धरतात. त्यांना गृहीत धरतात. त्यांचा आनंद हिरावतात. बाहेर मदतीचा आव आणणारे घरी त्यांच्या बाबतीत केलेली छोटीशी अपेक्षाही पूर्ण करत नाहीत. घरच्यांनाही आनंद देता येतो किंवा त्यांना मिळणाऱया आनंदात सामील होता येतं याची जाणीव त्यांना नसते. लहान-लहान मदतीतही फार मोठा आनंद मिळवता येतो. त्यासाठी फार वेळ, पैसा खर्च होणार नसतो.
कोणालातरी मदत केल्याने आणि त्यांच्या चेहऱयावर आलेल्या कृतज्ञतेच्या भावनेनंही आपल्याला लाखमोलाचा आनंद तर मिळतोच शिवाय इतरांना मदत करण्याची ऊर्मीही आपल्याला मिळते.
आपल्या घरी असणाऱया मोलकरणीचा वाढदिवस लक्षात ठेवून तिला आठवणीनं शुभेच्छा दिल्या तर तिच्या चेहऱयावरील आनंद आपल्याला खूप काही सांगून जातो.
हॉस्पिटलच्या वेटिंग रूममध्ये एखाद्या रुग्णाच्या नातेवाइकाचं बोलणं ऐकून त्याला दिलेला दिलासा आपल्यालाही दिलासा देऊन जातो की, आपण किमान त्याचं दु:ख ऐकून घेऊ शकतो.
रस्त्यावर आइस्क्रीम खात निघालो असताना अचानक एखाद्या बाल विपेत्यानं आपल्याकडे आशाळभूतपणे पाहावं आणि आपण त्यालाही तसाच आईस्क्रीम खाऊ घालावा. त्यामुळे त्या बालकाचा खुललेला चेहरा पाहण्यात जो आनंद असतो, तो कदाचित ते आईस्क्रीमही आपल्याला देऊ शकणार नाही.
रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण असे क्षण शोधायला शिकलो तर एक स्त्री म्हणून जगताना येणारे कटू अनुभव आपण विसरून पुन्हा नव्या ऊर्मीनं प्रेरीत होतो. ती प्रेरणा आपल्याला नव्यानं जीवन जगण्यासाठी तयार करते.
आपणही कुणालातरी मदत करू शकतो, कुणाच्यातरी चेहऱयावर आनंद फुलवू शकतो हे अनुभवणं आपल्याला मुक्तपणे जगल्याची अनुभूती देऊन जातो.
एरव्ही आपण सतत नातं जपण्याच्या, सांभाळण्याच्या कसरतीत असे क्षण गमावून बसतो.
मदतीच्या या आनंदाची देवाण-घेवाण आपण केली तर आनंद, सुखासाठी पैसा, वेळ खर्च करण्याची गरज भासणार तर नाहीच. पण सुख म्हणजे नक्की काय असतं तेही अनुभवता येईल.
आपण किमान एकदातरी असे वागून पाहा. किमान एकदातरी असे जगून पाहा. नक्कीच आपल्याला जीवनातील लाखमोलाचा आनंद अनुभवता येईल.