ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील हाजीपोरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. दरम्यान, एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
हाजीपोरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार शोधमोहीम सुरू करण्यात आली. शोधमोहिमेदरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलाचे जवान चोख प्रत्युत्तर देत आहेत. एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले असून, चकमक अजूनही सुरू आहे.