ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.
हिजबूलचे 5 ते 6 दहशतवादी शोपियां जिल्ह्यातील रेबन गावातील एका घरात लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यानुसार सुरक्षा दलाने सकाळी शोधमोहीम हाती घेतली. शोधमोहिमेदरम्यान सुरक्षा दलाने घराला चारही बाजूंनी वेढा दिला.त्यानंतर दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर गोळीबार केला. सकाळपासून सुरू असलेला गोळीबार काही तास थांबला होता. पुन्हा दहशतवाद्यांनी गोळीबार सूरु केला आहे.
दरम्यान, तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. लष्कराची 01 RR तुकडी, CRPF आणि पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. अजूनही घटनास्थळी चकमक सुरू असल्याची माहिती मिळत आहे.