ऑनलाईन टीम / श्रीनगर :
दक्षिण काश्मीरच्या शोपियांमधील रावळपोरा येथे सुरक्षा दलाच्या जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. या दहशतवाद्याकडील एम-4 काबॉईन, 36 काडतुसे, 9600 रुपयांची रोकड आणि काही आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे.
रावळपोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी रात्रीपासून चकमक सुरू आहे. शनिवारी रात्री दहशतवाद्यांनी 6 नागरिकांना ओलीस ठेवले होते. त्यांची सुरक्षा दलाने सुटका केली. ठार झालेल्या दहशतवाद्याची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र, यापूर्वी सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर विलायत उर्फ सज्जाद अफगाणीला घेराव घातल्याची माहिती दिली होती.