ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले. हे दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहेत. त्यांच्या ताब्यातील शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
शोपियां जिल्ह्यातील चौगाम येथे दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार लष्कराच्या संयुक्त पथकाने शोधमोहिम हाती घेतली. चौगामच्या ताडे भागात लष्कराचा घेराव घट्ट होताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यावेळी लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.