ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले. अजूनही या भागात चकमक सुरू असून, सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
शोपियां जिल्ह्यातील सुगू हेंदमा या भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार शोधमोहीम हाती घेण्यात आली. शोधमोहिमेदरम्यान 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले. लष्कराचे 44RR पथक, CRPF आणि जम्मू पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. या आठवड्यात शोपियां जिल्ह्यात झालेली ही तिसरी चकमक असून, आठवडाभरात 11 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे.