कोचरा येथील घटना
प्रतिनिधी / कुडाळ:
कोचरा-मठवाडी येथील रुची संतोष मेस्त्राr या सात वर्षीय मुलीचा कोचरा शाळा क्र. 1 नजीक एका घराशेजारी शौचालयाच्या टाकीत पडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. रुची आपल्या आजीसोबत तेथीलच एका दुकानावर गेली असताना ही घटना घडली. यामुळे मेस्त्राr कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
रुची आजीसोबत कोचरा-चव्हाटा येथे आली होती. तेथील पार्वती महादेव कांबळी यांच्या नवीन घरामागील शौचालयाच्या टाकीकडून ती जात असताना टाकीवरील कडाप्पाचे झाकण मोडून ती आत पडली. याबाबत यशवंत गोसावी यांनी निवती पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार, रुची शौचालयाच्या टाकीत पडल्याचे पार्वती यांनी आपणास सांगितले असता, आपण तसेच प्रवीण केरकर, सदानंद कांबळी, त्यांची पत्नी, रुचीची आजी, शांती गोसावी या सर्वांनी तिथे धाव घेतली. ती टाकीत उपडय़ा अवस्थेत पडलेली दिसली. आम्ही तिला बाहेर काढले. ती बेशुद्धावस्थेत होती. त्यानंतर तिचे वडील संतोष मेस्त्राr व शेजाऱयांनी तिला म्हापण येथे डॉक्टरकडे नेले. त्यांनी परुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यास सांगितले. तिथे नेऊन तपासणी केल्यावर डॉक्टरनी तिला मृत घोषित केले. निवती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. रुचीच्या अपघाती मृत्युमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.