पुणे / प्रतिनिधी :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी कर्मचारी श्रद्धा मोरेश्वर मोकाशी यांचे मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास वयाच्या 64 व्या वषी पुण्यात राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे.
पुणे विद्यापीठाच्या विविध विभागांत त्यांनी अत्यंत निष्ठेने काम केले. त्या अत्यंत शांत, संयमी, प्रेमळ व निगर्वी स्वभावाच्या होत्या. येथील वैकुंठ स्मशानभूमीत बुधवारी पहाटे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘तरुण भारत’चे वरिष्ठ प्रतिनिधी आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुकृत मोकाशी यांच्या त्या मातोश्री होत.