प्रतिनिधी / बेळगाव
श्रमिक अभिवृद्धी संघातर्फे हुक्केरी तालुक्मयातील दड्डी तालुक्मयातील व आजुबाजुच्या ग्राम पंचायतीअंतर्गत नरेगामध्ये काम करणाऱया महिलांचा मेळावा नुकताच पार पडला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर, ऍड. एन. आर. लातूर व डॉ. अमित भाते यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी कागणीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ऍड. वीणा देसाई यांनी महिला दिनाबद्दल माहिती दिली. ऍड. लातूर यांनी कामगार कार्डसंदर्भात माहिती दिली. जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीवर संशोधन करणारे डॉ. अमित भाते यांनी कोरोना आणि आपले आरोग्य याबाबत मार्गदर्शन करून शिबिर घेण्याचे आश्वासन दिले. कार्यकर्त्या अमिता नायगावकर यांनी महिला सक्षमीकरणाबद्दल विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन बसवंत कोले यांनी तर आभार यल्लाप्पा गस्ती यांनी मानले.
या मेळाव्यास दड्डी, गुडनट्टी, केडी, नागनूर, हत्तरगी, गोटूर, मन्नूर, गुटगुद्दी येथील रोजगारावरील कामगार व महिला तसेच मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे, विठ्ठल देसाई, ज्ञानेश्वर पाटील, राजू तारिहाळकर, सुधीर काकतकर, अडव्याप्पा कुंबरगी, शांतव्वा कुरबर, राहुल पाटील, सुरेश गस्ती आदी उपस्थित होते.