टिटिलागड
छत्तीसगडमधून तेलंगणा येथे गेलेली एक गर्भवती महिला लॉकडाऊनच्या चक्रव्यूहात सापडली होती. केंद्र सरकारकडून चालू करण्यात आलेल्या ‘श्रमिक स्पेशल रेल्वे’मधून परतताना वाटेतच तिला प्रसववेदना सुरू झाल्या. अन् रेल्वेतच तिने एका मुलीला जन्म दिला. नवजात बालिकेसह मातेला टिटिलागड रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोघांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सदर गर्भवती महिला कुटुंबासह श्रमिक रेल्वेमधून तेलंगणाहून आपल्या घरी परतत होती. त्या महिलेने कन्येला जन्म दिल्यावर श्रमिक रेल्वे काही काळ रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली होती.