आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याच्या हस्ते उदघाटन.
प्रतिनिधी /वाळपई
श्रावण मासानिमित्त कुडणे हरवळे होंडा येथील श्री आजोबा देवस्थान यांच्या आयोजन समितीतर्फे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .याची सुरुवात सोमवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी होणार असून संध्याकाळी 6.30 वाजता राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे .या कार्यक्रमास साखळी मतदार संघाचे माजी आमदार प्रताप गावस कुडणे देवस्थानचे अध्यक्ष सिद्धार्थ मळीक माजी पंचायत मंत्री वेंकटेश देसाई होंडा जिल्हा पंचायत सभासद सगुण वाडकर आजोबा देवस्थानचे माजी अध्यक्ष सुरेश माडकर साखळीचे माजी नगराध्यक्ष कुंदा माडकर होंडा सरपंच आत्मा गावकर माजी पंच उल्हास गावडे विद्यमान पंच सभासद शिवदास माडकर पंच सभासद प्रतीक्षा गावडे देवस्थानचे माजी अध्यक्ष प्रकाश गावस समितीच्या महिला अध्यक्ष सुफला देसाई व आजोबा देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रशांत देसाई कार्यक्रम अध्यक्ष विठोबा वांतेकर ह्यांची खास उपस्थिती लाभणार आहे .त्याचप्रमाणे देवस्थानचे कार्यकारी समितीचे उपाध्यक्ष धर्मेन शिरोडकर ,अंबरनाथ कोरगावकर सचिव अनंत धुमे, सहसचिव रामचंद्र मराठे खजिनदार सत्यवान नाईक उपखजिनदार राघोबा परब कार्यकारी सभासद जयसिंग पाटील संदीप केरकर हरिश्?चंद्र गावडे रामनाथ गावडे मंजुनाथ प्रभु ,नारायण दुलबाजी, के पलानिस्वामी, चंद्रकांत चाकुरकर सिद्धेश खानोलकर दीपेश मणेरकर माधव घोडेकर सल्लागार गुरुदास सामंत प्रकाश गवस यांची उपस्थिती लाभणार आहे.