प्रतिनिधी /फोंडा
सपना पार्क फोंडा येथील वनखात्याचे निवृत्त कर्मचारी श्रीकांत राघोबा देसाई (76 वर्षे) यांचे सोमवार 20 रोजी निधन झाले. अंत्यसंस्कार काल मंगळवार 21 रोजी सकाळी फोंडा येथील स्मशानभूमीत करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी धनवंती, पुत्र संजय, अंजय, विवाहित कन्या नीता, जावई डॉ. राजय पवार, स्नुषा व नातवंडे असा परिवार आहे.
अंत्ययात्रेला फोंडा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक व्यंकटेश नाईक, मगो पक्षाचे नेते डॉ. केतन भाटीकर, समाजकार्यकर्ते राजेश वेरेकर, संदीप खांडेपारकर व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली.