बेसिल : येथे सुरू असलेल्या स्वीस खुल्या सुपर 300 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय पुरूष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा किदांबी श्रीकांतने पुरूष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्याचप्रमाणे भारताच्या सात्विक साईराज आणि अश्विनी पोनाप्पा यांनी मिश्र दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. महिला एकेरीत भारताच्या सायना नेहवालचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले आहे.
भारताच्या चौथा मानांकित बॅडमिंटनपटू के. श्रीकांतने पुरूष एकेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या थॉमस रॉक्सेलचा 21-10, 14-21, 21-14 अशा गेम्स्मध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. 2015 साली या स्पर्धेत श्रीकांतने पुरूष एकेरीचे जेतेपद मिळविले होते.