खूशीच्या पदार्पणास बोनी कपूरची संमती
जान्हवी कपूरनंतर आता श्रीदेवी यांची छोटी कन्या खूशीच्या बॉलिवूडमधील प्रवेशावरून चर्चा सुरू आहे. खुशी यापूर्वीच समाजमाध्यमांवर अत्यंत सक्रीय असून वलयाप्रकरणी अनेकांवर मात करत आहे. पण आता खुशी लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार असल्याचे समजते.
जान्हवीची छोटी बहिण खुशीही लवकरच बॉलिवूडचा हिस्सा होईल. खुशी अभिनय करू इच्छिते आणि लवकरच यासंबंधी घोषणा ऐकायला मिळेल असे बोनी कपूर यांनी म्हटले आहे. बोनी कपूर हे चित्रपटसृष्टीतील दिग्गज निर्माते आहेत. परंतु त्यांनी खुशीला स्वतःच्या चित्रपटातून पहिली संधी देणार नसल्याचे स्पष्ट पेले आहे. यापूर्वी जान्हवी आणि अर्जुन यांनीही बॉलिवूडमध्ये जोरदार एंट्री केली असली तरीही त्यांनी घरातील प्रॉडक्शन हाउसची याकरता मदत घेतली नव्हती.