वार्ताहर/ रामदुर्ग
तालुक्यातील खानपेठ येथील श्रीधनलक्ष्मी सहकारी साखर कारखान्यांच्या प्रशासन मंडळाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची आज शनिवारी निवडणूक होऊन नुतन अध्यक्षपदी मल्लेशप्पा यादवाड व उपाध्यक्षपदी बसनगौडा गौडर यांची अविरोध निवड झाली. प्रशासना मंडळाचे 18 सदस्य असणाऱया कारखान्यस मल्लेशप्पा यादवाड हे अध्यक्षस्थानानस व बसनगौडा गौडर हे उपाध्यक्षस्थानास नामांकन पत्र दाखल केले होत. अध्यक्ष्घ् व उपाध्यक्ष स्थानास एकेक नाक्मांकन पत्र दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी महेश ….. यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षपदी अविरोधन निवड झाल्याचे घोषित केले. कारख्घन्याचे निकटपूर्व अध्यक्ष आमदार महादेवप्पा यादवाड यांनी नुतन अध्यक्षांना अधिकार हस्तांतर केले. याप्रसंगी बोलताना म्हणाले की, माजी आमदार कै. बी. बी. हिरेरेड्डी यांच्या परीश्रमानो कारखाना सुरु झाला असून सन 2006 मध्ये आर्थिक संकटामुळे जी. एम. आर. कंपनीस लीजवर देण्यात आले होते. पण गेल्या दहावर्षापासून अध्यक्ष म्हणून मी कारखाना व्यवस्थीत सुरु ठेवला असून नुतन अध्यक्ष व उपाध्यक्षांनी व सर्व निर्देशक सदस्यांनी विश्वासात घेत व्यवस्थीतपणे पुढे चालवून न्यावा असा सल्ला दिला. नुतन अध्यक्ष मल्लण्णा यादवाड बोलताना म्हणाले की, ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थीत चालवून नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचा भरवसा दिला.
उपाध्यक्ष बसनगौडा गौडर, पैरी कंपनीचे एम. डी. रविंद्र देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी निर्देशक सदस्य ए. सी. सुरग, आय. एस. हरनट्टी, बी. एम. तुप्पद, एस. एल. हुल्लोळ्ळी. टी. बी. पाटील, दुंडप्पा देवरेड्डी, एम. एम. अतार, निलप्पा चाकलब्बी, एस. जी. पाटील. एस. आर. करदीन, बी. ए. पाटील, चंदू रजपूत, वाय. बी. चिप्पलकट्टी, श्रीमती नागव्वा मुरगोड, शशिकला सोमगोंड, डीसीसी बँक निर्देशक एस. एस. धवन, जि. पं. सदस्य मारुती तुप्पद, एस. जी. मालवाड आदी उपस्थित होते.