श्रीनगर/प्रतिनिधी
श्रीनगरमध्ये एका शाळेत दहशतवाद्यांनी गोळीबाराची घटना घडली असून यामध्ये दोन शिक्षकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दहशतवाद्यांनी शाळेच्या शिक्षकांवर गोळीबार केला असून यात मृतांमध्ये महिला मुख्याध्यापकाचा समावेश आहे. जखमी झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे समजते.
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील एका ईदगाहवर गुरुवारी दहशतवादी हल्ला झाला. यावेळी दहशतवाद्यांनी सर्वसामान्य नागरिकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या शिक्षकांची ओळख पटवण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, श्रीनगरमधील इदगाह परिसरात असणाऱ्या शाळेत जाऊन दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात दोन शिक्षकांवर गोळीबार केला. यामध्ये महिला मुख्याध्यापकाचाही समावेश आहे. सतिंदर कौर असं महिला मुख्याध्यापिकेचं नाव आहे तर शिक्षकाचे नाव दीपक चांद असं आहे. दोघांचाही दहशतवाद्यांच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे.