ऑनलाईन टीम / श्रीनगर :
श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दल आणि पोलिसांच्या तुकडीवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात एक पोलीस आणि एक नागरिक जखमी झाला आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घातला असून, दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.
दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील साझगरिपोरा येथे पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाला लक्ष्य केले. या गोळीबारात जखमी झालेला जम्मू-काश्मीर पोलिसांचा एक जवान आणि एका नागरिकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.