प्रतिनिधी / पणजी
केंद्रीय आयुषमंत्री आणि उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक यांची प्रकृती स्थीर असून दिल्ली येथील एम्स हॉस्पिटलमधून आलेल्या दोन तज्ञ डॉक्टरांनी मंगळवारी त्यांची तपासणी करून उपचारांचा आढावा घेतला. त्यांनी एकंदरीत उपचारांबाबत व नाईक यांच्या प्रकृतीसंदर्भात समाधान व्यक्त केले आहे. सध्या त्या दोन डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मणिपाल इस्पितळात भेट देऊन नाईक यांची विचारपूस केली. तसेच दिल्लीचे, गोमेकॉचे व मणिपालमधील डॉक्टर्सशी चर्चा करून एकंदरीत आढावा घेतला.