पणजी प्रतिनिधी
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांना गोव्याचे माननीय राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रति÷sचा मानला जाणारा 2020 सालासाठीचा ‘चॅम्पयिन्स ऑफ चेंज‘ 2020 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दोनापॉल, पणजी येथील ताज रिसॉर्ट अँड कन्व्हेन्शन सेंटर येथे हा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात पार पडला.
चॅम्पयिन ऑफ चेंज पुरस्कार समारंभ ’इंटरेक्टिव फोरम ऑन इंडियन इकॉनॉमी‘’ (आयएफआयई) च्या वतीने ’ ‘पॉवर कॉरिडोर‘ आणि हिंदी न्यूज पोर्टल ’ पंचायती टाईम्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने दर वषी विविध ठिकाणी आयोजित केला जातो.
चॅम्पयिन ऑफ चेंज पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष माजी मुख्य न्यायाधीश के. जी. बालकृष्णन हे असून या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे पूर्व न्यायाधिश ज्ञान सुधा मिश्रा, जे÷ पत्रकार वेद प्रताप वैदिक आणि महिला व बाल कल्याण मंत्रालयाचे माजी सचिव श्री. शंकर अग्रवाल या अतिमहनीय मान्यवरांचा समावेश आहे.
विविध क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी बजावलेल्या व्यक्तींनाही या पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. या पुरस्कार विजेत्यांमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोव्याची प्रसिद्ध गायिका हेमा सरदेसाई, प्रसिद्ध गायक सोनू निगम, अभिनेत्री सुश्मिता सेन आदी एकूण 38 मान्यवरांचा समावेश आहे.
महाराष्ट्र आणि गोव्याचे माननीय राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी हे चॅम्पयिन्स ऑफ चेंज अवॉर्डच्या तिसऱया आवृत्तीचे प्रमुख पाहुणे होते. माजी मुख्य न्यायाधीश के.जी. बालकृष्ण हे या कार्यक्रमाला सन्माननीय आतिथी म्हणून उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती ज्ञान सुधा मिश्रा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सि?गच्या माध्यमातून या समारंभास उपस्थिती लावली.
आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री श्री. नाईक म्हणाले, “हा सन्मान मिळाल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. कोरोनाविरूद्धची लढाई मोठय़ा प्रखरतेने सुरू आहे आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारचे गौरव जीवनातील अनेक प्रकारच्या लढाया लढण्यासाठी निश्चितपणे खूप उपयुक्त ठरतील. “
प्रमुख पाहुणे, माननीय राज्यपाल यांनी पुरस्कार विजेत्यांनी मुक्तकंठाने प्रसंशा केली. ते म्हणाले की, “एक मजबूत राष्ट्र घडविण्याच्या प्रक्रियेत आणि जगावर कोसळलेल्या संकटांवर
मात करण्याच्या लढाईत हे पुरस्कार विजेते मोलाचे योगदान देऊ शकतील. निस्वार्थपणे जनसेवा करण्यासाठी असा लोकांची आम्हाला नितांत गरज आहे”.
चॅम्पयिन ऑफ चेंज हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, “माणसामधील तीव्र उत्कटता त्याला असामान्य कामगिरी करण्यासाठी उद्युक्त करीत असते, असे मला आवर्जून नमूद करायचे आहे. चॅम्पयिन ऑफ चेंज हा सन्मान म्हणजे समाजात बदल घडविणारे एक ऊर्जास्त्राsत आहे. .