प्रतिनिधी/ पणजी
केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना ताप आल्यामुळे मणिपाल इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार चालू आहेत. त्यांचा कोरोना अहवाल पोझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वतःला होम आयसोलेशन करून घेतले होते. तथापि, रात्री उशिरां त्यांना ताप आल्यामुळे इस्पितळात न्यावे लागले. त्यांची प्रकृती स्थीर असून डॉक्टर्स लक्ष ठेऊन आहेत. त्यांची पत्नीसुद्धा कोरोना बाधित झाली असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन श्री. नाईक यांनी पुन्हा एकदा केले आहे. नाईक यांची प्रकृती सुधारली आहे.
—-
कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी स्वतःहून पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे. सरकारतर्फे आरोग्य खात्याच्या वतीने गोवा मेडिकल कॉलेज इस्पितळात प्लाझ्मा बँक सुरू करण्यात आली असून कोरोना महामारीच्या या संकटात सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. त्याकरीता कोरोनमुक्त झालेल्यांनी मदतीचा हात पुढे करून प्लाझ्मा दान केल्यास इतर कोरोनरोग्यांना फायदा होऊ शकतो. अशा लोकांसाठी घरून नेण्याकरीता व पुन्हा घरी पोहोचविण्याकरीता वाहतूक सोय करण्यात आली आहे. त्याकरीता डॉ. प्रिती – 7875181284 किंवा मार्सेलिना – 9822791732 यांच्याशी संपर्क करावा, असे कळविण्यात आले आहे.