नवी दिल्ली : बेंगळूरची कंपनी श्रीराम प्रॉपर्टीज आपला इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजेच आयपीओ भारतीय भांडवली बाजारामध्ये सादर करणार आहे. सदरच्या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 800 कोटी रुपये उभारणार आहे, असे समजते. याच आठवडय़ामध्ये आयपीओ सादर करण्यासंदर्भात बाजारातील नियामक सेबीकडे अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे. टीपीजी कॅपिटल, टाटा कॅपिटल, वॉल्टन स्ट्रीट कॅपिटल आणि स्टारवुड कॅपिटल यांचा कंपनीमध्ये 58 टक्के इतका वाटा आहे. दरम्यान कंपनी आपला आयपीओ पुढच्या महिन्यात सादर करू शकते, असेही कंपनीच्या सूत्रांनी म्हटले आहे.
Previous ArticleIPL वेळापत्रक २०२१
Next Article रेकॉर्डवरील दोघे जिल्हय़ातून हद्दपार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.