पणजी / प्रतिनिधी
श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र न्यास संचालित श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सुलक्षणा प्रमोद सावंत व कुटुंबीय यांच्या हस्ते श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास गोवा समितीकडे पाच लाखांचा धनादेश सुपूर्द करून झाले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा विभाग सहसंघचालक राजेंद्र भोबे गोवा विभाग अभियान प्रमुख मोहन आमशेकर, अभियान मार्गदर्शक कांता पाटणेकर, उत्तर गोवा प्रमुख शंभू परब, सहप्रमुख श्रीहरी आठल्ये उपस्थित होते. निधी समर्पण अभियान दि.15 जानेवारी ते 27 फेब्रुवारी या कालावधीत संपूर्ण गोवा प्रदेशात संपन्न होणार आहे.