ऑनलाईन टीम / कोलंबो :
श्रीलंकेतील मिन्नेरिया नॅशनल पार्कमध्ये एका हत्तिणीने जुळ्या पिल्लांना जन्म दिला आहे. श्रीलंकेत जुळ्या हत्तींचा जन्म होण्याची ही पहिलीच घटना आहे.
मिन्नेरिया नॅशनल पार्कमधील वन्यजीव संशोधक सुमित पिलापीतीया यांनी या हत्तींची छायाचित्रे प्रसार माध्यमांना दिली आहेत. ही पिल्ले तीन ते चार आठवड्यांपूर्वी जन्मली आहेत. अशी पिल्ले जन्माला येण्याचे प्रमाण केवळ एक टक्के असून, ती मोठी होईपर्यंत जगण्याचे प्रमाणही कमीच आहे.