ऑनलाईन टीम / कोलंबो :
श्रीलंकेत कोरोनाचा आतापर्यंचा सर्वात धोकादायक स्ट्रेन आढळून आला आहे. हा स्ट्रेन हवेत एक तास जिवंत राहत असल्याची माहिती श्रीलंकेच्या जयवर्देनापुरा यूनिवर्सिटीमधल इम्युनोलॉजी ऍन्ड मॉलिक्मयुलर सायंसेस विभागाच्या प्रमुख नीलिका मालाविगेने यांनी दिली.
मालाविगेने म्हणाल्या, श्रीलंकेत आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन हवेत एक तास जिवंत राहू शकतो. त्याचा पसरण्याचा वेगही अधिक असल्याने तो सहजरित्या एका व्यक्तीपासून दुसऱ्याला संक्रमित करू शकतो. त्यामुळे तो आतापर्यंतचा सर्वात अधिक धोकादायक स्ट्रेन आहे.
श्रीलंकेत मागील आठवड्यात झालेल्या नववर्षाच्या उत्सवापासून कोरोनाचा हा नवीन स्ट्रेन पसरण्यास सुरुवात झाली. या स्ट्रेनने तरुणांना अधिक संक्रमित केल्याची भीती असून, पुढील काही दिवसात श्रीलंकेत तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामळे श्रीलंकेत 31 मे पर्यंत कडक निर्बंध लावण्यात येणार असल्याचे आरोग्य आधिकारी उपल रोहाना यांनी म्हटले आहे.