कोलंबो
श्रीलंकेला सध्या तिसऱया कोरोना लाटेचा सामना करावा लागत असून सरकारने याची दखल घेत 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन जारी केला आहे. प्रशासनाने या काळात आवश्यक तो बंदोबस्त करण्याची उपाययोजना आखली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ पाहून सरकारने सदरचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारपासून श्रीलंकेत लॉकडाऊन अंमलात आला आहे. वाढत्या रुग्णसंख्येबाबत डॉक्टर वर्ग व बौद्ध समूदायाने सरकारवर दबाव आणला होता. यानंतर श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाभाया राजपक्षे यांनी अखेर 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. सदरचा लॉकडाऊन 30 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 वाजता संपणार आहे. यापूर्वी राष्ट्रपती लॉकडाऊन जारी करण्याबाबत आग्रही नव्हते. अर्थव्यवस्थेचे नुकसान होणार ही भीती त्यांनी व्यक्त केली होती. पण डॉक्टर व बौद्धवर्गाच्या दबावानंतर सरकारला अखेर नमते घेत लॉकडाऊन जारी करणं भाग पडलं आहे.