कोलंबो
आर्थिक संकटाला तोंड देणाऱया श्रीलंकेत इंधनसाठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. यामुळे श्रीलंकेच्या सरकारने पेट्रोल-डिझेलच्या विक्रीवर 2 आठवडय़ांसाठी बंदी घालण्याची घोषणा केली आहे. ही बंदी 10 जुलैपर्यंत लागू राहणार आहे. केवळ आवश्यक सेवांसाठी इंधन उपलब्ध करण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. आवश्यक सेवांमध्ये आरोग्य, कायदा-सुव्यवस्था, बंदर, विमानतळ, अन्नधान्य आणि कृषी सेवांनाच इंधन उपलब्ध होऊ शकणार आहे. सर्वसामान्य लोकांना होत असलेल्या त्रासाबद्दल खेद असल्याचे सरकारचे प्रवक्ते बांदुला गुणवर्धने यांनी म्हटले आहे.