कोलंबो
श्रीलंकेतील आरोग्य विभागाने मुलांच्या लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. 12 ते 15 वयोगटातील मुलांचे लसीकरण सध्या देशात करण्यात येत आहे. ओमिक्रॉनच्या प्रसाराचा इशारा मिळाल्यानंतर सरकारने याची दखल घेतली आहे. ओमिक्रॉनची गती पाहून आरोग्य विभागाने मुलांचे लसीकरण सुरू केले आहे. मुलांना कोरोनाप्रतिबंधक अशी फायजरची लस दिली जात असल्याचे समजते. यापूर्वी 15 वर्षांवरील मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. येत्या सोमवारपासून शाळा सुरू होणार आहेत. त्याही पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याने आरोग्य विभागाने मुलांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. सरकार आता श्रीलंकेत सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱयांना लसीकरण प्रमाणपत्र सक्तीचे करणार असल्याचे समजते. देशातील 64 टक्के म्हणजे 22 दशलक्ष लोकांचे पूर्णतः लसीकरण झाले आहे.