प्रतिनिधी /पणजी
मळार-ओल्ड गोवा येथील श्री वनदेवी मुकोबा देवस्थानच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा 35 वा वर्धापनदिन सोहळा आज मंगळवार दि. 15 फेब्रुवारी ते गुरुवार 17 फेब्रुवारीपर्यंत विविध धार्मिक विधी, पालखी मिरवणूक तसेच सांस्कृतिक कार्यकमांनी उत्साहात साजरा करण्यात येईल.
आज मंगळवारी सकाळी 10 वा. महापुजा, त्यानंतर महाभिषेक, आरत्या, तीर्थ प्रसाद, दुपारी 3 वाजता श्री वनदेवीची पालखीतून गावात मिरवणूक निघणार असून यावेळी घरोघरी वनदेवीचे आगमन, पुजा होणार आहे. रात्री पालखीचे देवस्थानात आगमन होताना सुवासिंनींतर्फे दिवजोत्सव होईल. पालखी मंदिरात दाखल झाल्यानंतर गावच्या महिलांतर्फे फुगडी सादर करण्यात येईल.
उद्या बुधवारी सकाळी धार्मिक विधी, रात्री 9 वा. पावणी व त्यानंतर विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रमांचे स्नेहसंमेलन होईल. गुरुवार दि. 17 फेब्रुवारी सकाळी धार्मिक विधी, रात्री 9 वाजता पावणी व त्यानंतर नाटक ‘ना म्हणप ना’ हे कोकणी नाटक सादर होईल.
कोरोना महामारीचा अजूनही संपूर्णतः अंत झालेला नाही. धोका अजून कायम आहे. त्यामुळे सर्व भाविकांनी कोरोना मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन देवीच्या कृपेस पात्र होण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती श्री वनदेवी मुकोबा देवस्थान समितीतर्फे करण्यात आली आहे.