प्रतिनिधी /काणकोण
नवी दिल्ली येथील नीती आयोगाचे सदस्य आणि दीनदयाळ रिसर्च संस्थेचे सरचिटणीस अतुल जैन यांनी श्रीस्थळ, काणकोण येथील जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱयांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. त्यावेळी त्यांच्यासमवेत गोवा राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप सरमुकादम उपस्थित होते. श्रीस्थळ येथे जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनय तुबकी, सचिव शिरीष पै यांनी त्यांचे स्वागत केले. सदर समितीच्या कार्याचे जैन यांनी कौतुक केले आणि आवश्यक ते मार्गदर्शन केले.