प्रतिनिधी / वास्को
हेडलॅण्ड-सडा येथील श्री इस्वटी ब्राह्मण लक्ष्मी-नारायण देवालयात गुरूवारी उदक शांती पूजा करण्यात आली. मंदिराचे शुद्धीकरण तसेच नकारात्मक शक्तीचा नाश होऊन दैवी उर्जा संपादन करणे व प्रसन्नतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी या पुजेचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्य पुरोहित विश्वजीत फडते यांच्या पौरोहित्याखाली केलेल्या या पुजेचे यजमानपद सौ. अर्चना व श्री. संदीप प्रभाकर पालेकर यांनी भुषविले. अन्य पुरोहितांच्या उपस्थितीत वेदमंत्रासह श्री लक्ष्मी-नारायण देवतांची पंच सुक्तांनी अभिषेक पूर्व महापूजा करण्यात आली. दुपारी आरती व गाऱहाणे नंतर तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. कोरोना नियमाचे पालन करून उदक शांती पूजा करण्यात आली.