ध्वजारोहण, गणहोम आणि राधाकृष्ण विवाह सोहळा संपन्न
प्रतिनिधी/ सातारा
येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिराचा वार्षिक देवदेवतांचा उत्सव सोहळा मोठय़ा उत्साहात आरंभ झाला आहे. कांची कामकोटी पीठाचे जगदगुरु शंकराचार्य महास्वामी श्री श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी यांच्या व महास्वामी प.पू. श्री श्री जयेंद्र सरस्वती यांच्या कृपेने व परमपूज्य जगदगुरु शंकराचार्य श्री श्री शंकर विजयेंद्र सरस्वती यांचे शुभाशिर्वादाने हा सोहळा संपन्न होत आहे.
. मंदिरात वेदमंत्रांचा जयघोषात ध्वजारोहण करून या कार्यक्रमांना सुरुवात झाली .मंदिराचे व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग व सौ. उषा शानभाग यांच्या हस्ते वेदमूर्ती दत्त शास्त्राr जोशी व वेदमूर्ती जगदीश शास्त्राr भट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली हे धार्मिक कार्यक्रम सुरू झाले .ध्वज उभारल्यानंतर प्रधान संकल्प सोडण्यात आला. त्यानंतर विघ्नहर्त्या गणरायाचे आशीर्वाद लाभावे त्यासाठी गणहोम करण्यात आला .त्यानंतर मंदिरातील श्री राधाकृष्ण देवदेवतांचा कल्याणम अर्थात विवाह सोहळा संपन्न झाला.
यावेळी सातारा येथील सुप्रसिद्ध दिपलक्ष्मी उद्योग समूहाचे सौरभ प्रमोद लाहोटी व सौ .आस्था सौरभ लाहोटी यांच्या शुभहस्ते यजमानपद संपन्न झाले. यावेळी रमेश शानभाग ,उषा शानभाग ,विश्वस्त नारायण राव, रमेश हलगेकर, राहुल घायताडे, व्यवस्थापक चंद्रन , प्रमोद लाहोटी,मंदीराचे ब्रम्हवृंद उपस्थीत होते.
सोमवार दि. 28 रोजी सायंकाळी सहा वाजता दिपोत्सव तसेच श्री महागपतीचा रथोत्सव संपन्न होणार आहे.मंगळवारी दि. 29 डिसेंबरला सकाळी 5 ते 12 या वेळेत श्री गणपती होम, मुर्ती यात्रा दान आणी रुद्र होम हाणार आहे. बुधवारी दि. 30 डिसेंबरला चर्तुवेद पारायण होउन पुणे येथील श्री राधाकृष्ण शास्त्राr मेमोरियल ट्रस्टचे वतीने श्री नटराज व शिवकामसुंदरी देवीस महाभिषेक होउन या देवाचा लग्न सोहळा अर्थात कल्याणोत्सव संपन्न होणार आहे. त्यानंतर पारायण समाप्ती होउन महाप्रसाद वितरीत केला जाणार आहे. वरील सर्व रथोत्सवाचे कार्यक्रमास सातारकर भावीकांनी तन,मन,धन अर्पून मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नटराज मंदिराचे व्यवस्थापकिय विश्वस्त रमेश शानभाग यांनी केले आहे. मात्र यावर्षी करोना आजाराचे संकट असल्याने दरवर्षी साजरा होणारा भव्य दिव्य आणि सातारा शहरातून निघणारा नटराज आणि देव देवताचा र्व्षिक रथोत्सव मात्र रद्द् करण्याचा निर्णय मंदीर व्यवस्थापन समितीने घेतला आहे.