प्रतिनिधी / कुरुंदवाड
शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे येत्या रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी होणाऱ्या ब्राह्मण परिवार महा अधिवेशनाच्या मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ येथील पुजारी मंडळींचे खातेदार दिगंबर खातेदार यांच्या हस्ते स्तंभ पूजन करून करण्यात आला. यावेळी दत्त देव संस्थानचे अध्यक्ष रामकृष्ण पुजारी सचिव अमोल विभुते माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य धनाजी राव जगदाळे, माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अशोक पुजारी, उपसरपंच गुरुदास खोचरे, दत्त देव संस्थानचे माजी अध्यक्ष शशिकांत पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील जगदाळे पॉलिटेक्निकच्या भव्य अशा पाच एकरातील मैदानावर हा ‘महापरिवार मेळावा’ होणार असून या ठिकाणी पन्नास हजार चौरस फुटाचा मंडप, स्टेज, स्वतंत्र पार्किंग, भोजन कक्ष, प्राथमिक आरोग्य सुविधा आधी सुविधांचे नियोजन करण्यात येणार आहे.
रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता दत्त मंदिर पासून शोभायात्रेने या अधिवेशनास प्रारंभ होणार आहे. सकाळी दहाला उद्घाटन समारंभ होणार असून या कार्यक्रमाला जगद्गुरु शंकराचार्य करवीर पीठ काळाराम मंदिर, नाशिकचे सुधीर दास महंत, इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजिस्ट मॅनेजिंग पार्टनर एस व्ही कुलकर्णी, सुधीर गाडगीळ, माजी मंत्री शोभाताई फडणवीस आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून या अधिवेशनाचा समारोप सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील-यड्रावकर, सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर, हार्दिक जोशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
आजच्या मंडप काम शुभारंभ प्रसंगी महादेव पुजारी, अवधूत पुजारी, बाळासाहेब अलास्कार, महेश पुजारी, विनोद पुजारी, मुकुंद सावकार, अक्षय पुजारी, चंद्रकांत कोडणीकर, संदिप वडीकर, योगेश मावळणकर, विलास जोशी, बळवंत जोशी, मकरंद देशपांडे संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांसह ब्रह्मवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.