शहाजी पाटील यांचे पुनर्रागमन
वारणानगर / प्रतिनिधी
येथील श्री. तात्यासाहेब कोरे वारणा सह. साखर कारखान्याची सन २०२०-२१ ते २०२५-२६ या कालावधीसाठीची पंचवार्षिक निवडणूक वारणासमूहाचे अध्यक्ष माजी मंत्री आ. विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली सलग पाचव्यांदा बिनविरोध झाली. नवीन निवडून आलेल्या संचालक मंडळात दोन महिलासह आठ नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली असून यामध्ये पारगांव परिसराचे जेष्ठ नेते शहाजीराव पाटील (बापू) यांचे पुनर्रागमन झाले आहे.
साखर कारखानदारीत सहकारातील आदर्श मानदंड निर्माण केलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर ता. पन्हाळा येथील श्री. तात्यासाहेब कोरे वारणा सह. साखर कारखान्याची २१ जागेसाठी लागलेली पंचवार्षिक निवडणूक पन्हाळा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बी.आर. माळी यानी पन्हाळा येथील निवडणूक कार्यालयात आज दि.१८ रोजी निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहिर केले. काही अपक्ष व जय शिवराय किसान संघटनेच्या उमेदवारांची नावे छाऩनीतच निघाल्याने बिनविरोध निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला होता. सत्ताधारी गटातून वेगवेगळ्या गटात अनेक अर्ज होते. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी दि. १७ रोजी २१ जागेसाठी २१ उमेदवाराचे अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध घोषीत करण्यात आली २१ मधील भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून संचालक काकासो महादेव चव्हाण यांच्या विरोधात कोणताही अर्ज दाखल झाला नव्हता. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यतील पन्हाळा, हातकंणगले, वाळवा, शिराळा या चार तालुक्यातील वारणा नदीच्या दोन्ही तिरावरील सुमारे ८० गांवातील २० हजार सभासद या कारखान्याचे आहेत.
ऊस उत्पादक गट क्र.१ मधून वारणा समूहाचे प्रमुख आ. विनय विलासराव कोरे-वारणानगर, सुभाष आनंदराव पाटील-कोडोली, सुभाष तुकाराम कणसे-सातवे सर्व ता. पन्हाळा.
ऊस उत्पादक गट क्र.२ मधून प्रदिप निळकंठ तोडकर-अंबप, उदय सर्जेराव पाटील-चावरे, शहाजीराव भाऊसो पाटील- जुने पारगांव,
ऊस उत्पादक गट क्र. ३ मधून सुभाष कृष्णा जाधव-घुणकी, रावसो भाऊसो पाटील-भादोले, सुभाष पुरंदर पाटील-नागांव, सर्व ता.हातकंणगले
वाळवा तालुका-ऊस उत्पादक गट क्र. ४ मधून विद्यमान व्हा.चेअरमन प्रतापराव बाळकृष्ण पाटील-शिगांव, संदीप गोविंदराव जाधव-येलूर, राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष डॉ. प्रताप बाजीराव पाटील-ऐतवडे खुर्द
ऊस उत्पादक गट क्र. ५ मधून शामराव बाबुराव पाटील-सांगव, विजय सुभाष पाटील-मांगले दोघे ता. शिराळा, व श्रीनिवास विश्वनाथ डोईजड चिकुर्डे, ता. वाळवा
उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था व बिगर उत्पादक व्यक्ती गटातून किशोरकुमार जयसिंगराव पाटील कणेगांव ता. वाळवा,
अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती गटातून विजय बळवंत धनवडे-किणी ता. हातकंणगले,
महिला गटातून रंजना प्रतापराव-कांदे ता. शिराळा, वैशाली सुरेश पाटील-कोडोली ता. पन्हाळा,
मतदार संघ इतर मागास प्रवर्ग गटातून पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती रविंद्र आ. जाधव बहिरेवाडी पन्हाळा,
भटक्या विमूक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग गटातून काकासो महादेव चव्हाण-भेंडवडे, ता. हातकंणगले या संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे.