प्रसिद्ध नाटय़ कलाकार प्रकाश साळकर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /तिसवाडी
कालापूर येथील श्री रामदास संगीत सांस्कृतिक संस्थेचा उद्घाटन सोहळा नुकताच विविध कार्यक्रमानिशी उत्साहात साजरा करण्यात आला.
संगीत क्षेत्रातील युवा प्रतिभेला व्यासपीठ निर्माण करण्याच्या हेतूने श्री रामदास संगीत सांस्कृतिक संस्थेने उचललेले पाऊल प्रशंसनीय आहे. असे उद्रगार प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना श्री. प्रकाश साळकर यांनी काढले.
यावेळी समाजसेवक श्री. हेमंत गोलतकर, स्थानिक पंच दिशा कवळेकर, सौ. हेमांगी गोलतकर, ज्येष्ठ कलाकार श्री. शेखर नागडे, इंजिनिअर श्री. राघाकृष्णन, इत्यादी. मान्यवर उपस्थित होते.
संगणक व भ्रमणध्वनीचा मारा युवा पिढीवर होत असताना अशाप्रकारचे संगीत वर्ग युवापिढीला नक्कीच दिशादर्शक ठरतील असे आशावादी मत श्री. हेमंत गोलतकर यांनी प्रमुख वक्ते या नात्याने बोलताना काढले.
संस्थेचे सचिव श्री. अनील नाईक, खजिनदार श्री. संतोष भट, उपसचिव श्री मंगेश गांवस, उपाध्यक्ष श्री. गुरुदास सावईवेरेकर, उपखजिनदार रजनी रामदास नाईक, श्री. जितेंद्र नाईक, श्री. सुभाष मोरजकर, श्री. रविंद्र नाईक सांतीनेसकर, श्री. मोहन गावस यांनी यावेळी आपले विचार मांडले.
उपस्थितांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेश नाईक यांनी केले तर आभार श्री. सुनील सांतीनेसकर यांनी मानले. सूत्रसंचालनाची जबाबदारी सौ. शमिता सांतीनेसकर यांनी पार पाडली.
संगीत विद्यालयात सहभागी होऊ इच्छिणाऱयांनी सौ. वंदिता सपंर्क क्र , 788352975 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.