प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिल्हय़ातील सौंदत्ती तालुक्मयातील श्री रेणुका यल्लम्मा देवस्थान दि. 31 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहे. कोरोना पूर्णतः गेला नसल्याने भक्तांच्या आरोग्याच्या हितासाठी जिल्हाधिकाऱयांनी हा निर्णय घेतला आहे. दि. 28 रोजी पौष पौर्णिमेनिमित्त होणारा यात्रोत्सवसुद्धा रद्द करण्यात आला आहे. दि. 22 जानेवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत भाविकांनी आपल्या घरीच पूजा विधी कराव्यात, असेही जिल्हाधिकाऱयांनी कळविले आहे. अशी माहिती देवस्थानचे कार्यकारी अधिकाऱयांनी पत्रकाद्वारे दिली आहे.