प्रतिनिधी / बेळगाव
श्री सत्य प्रमोद सेवा संघ व फेसबुक प्रेन्डस् सर्कल यांच्यावतीने सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात असणाऱया रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना पुलावाची पाकिटे वितरीत करण्यात आले. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके व सागर पाटील यांच्या हस्ते पुलाव वितरीत करण्यात आला.
याप्रसंगी संतोष दरेकर, व्हीक्टर फ्रान्सीस, शहाबुद्दीन बोंबेवाले, धिरेंद्र कट्टी, श्रीधर हलगत्ती, पूर्णबोध कट्टी आदी उपस्थित होते.