गोमातांना आसरा देण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा पुढाकार
प्रतिनिधी / बेळगाव
दुग्धोत्पादनातून शेतकऱयांचे जीवनमान उंचावणाऱया परंतु तेच उत्पन्न बंद झाल्यावर सोडून दिल्या जाणाऱया गोमातांना आसरा देण्यासाठी व त्यांचे रक्षण करण्यासाठी शिवप्रति÷ान हिंदुस्थानने पुढाकार घेतला
आहे.
कलखांबजवळील मराठा कॉलनीच्या मागे श्री शिवप्रति÷ान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांच्यावतीने वसुबारसच्या मुहूर्तावर श्री सिद्धेश्वर गोशाळेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवप्रति÷ानचे जिल्हाप्रमुख किरण गावडे यांच्या हस्ते पूजन करण्यात
आले.
गायींमधील काम करण्याची क्षमता संपल्यावर तसेच गायींना व्याधी झाल्यास त्यांना मोकळय़ावर सोडून देण्यात येते. त्यामुळे असे न करता त्या गायी शिवप्रति÷ानकडे सुपूर्द कराव्यात, अशी विनंती शिवप्रति÷ानचे विभाग प्रमुख हिरामणी मुचंडीकर यांनी केली आहे. यावेळी शिवप्रति÷ान हिंदुस्थानचे शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित
होते.