क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
श्री स्पोर्ट्स खडकगल्ली आयोजित वेस्टलिंग वूड्स दांडेली पुरस्कृत श्री चषक निमांत्रितांच्या आंतरजिल्हा टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेला 20 फेब्रुवारीपासून व्हॅक्सिन डेपो मैदानावर प्रारंभ होणार आहे.
शनिवार दि. 19 फेब्रुवारीपासून प्रदर्शनीय सामने खेळविण्यात येणार आहेत. पत्रकार इलेव्हन, टिळकवाडी पोलीस, हेस्कॉम व बेळगाव लेजेंड 40 वर्षावरील संघांत हे सामने होणार आहेत. याच दिवशी मुख्य स्पर्धेचे उद्घाटनही होणार आहे. 20 फेब्रुवारीपासून प्रमुख स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
या स्पर्धेत आपली नावे नोंदवावीत. पहिल्या 36 संघांना प्राधान्य दिले जाणार असल्याने इच्छुक संघानी 18 फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विजेत्या संघाला श्री वेस्टलिंग वुड्सतर्फे 1,11,111 तर उपविजेत्या संघाला 55,555 रूपये रोख व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे, त्याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट झेल, उत्कृष्ट यष्टीरक्षक, उत्कृष्ट संघ व मालिकावीर अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत फेकी गोलंदाजीला बंदी घालण्यात आली आहे. नावनोंदणीसाठी इच्छुक संघानी आनंद चव्हाण, प्रसाद एस., निकेष के., विनायक चव्हाण, सुनील नायडू यांच्याशी संपर्क साधावा.