श्वानाला लास्ट स्टेजचा कॅन्सर, मालकाने पाठीवर बांधून फिरविले
श्वान आणि माणसांच्या मैत्रीच्या अनेक गोष्टी ऐकायला मिळतात. एका व्यक्तीने स्वतःच्या श्वानाला त्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी डोंगरदऱयांची सैर घडविली आहे. लेब्राडूडल श्वानाचे नाव मॉन्टी होते. त्याला डोंगरांवर फिरणे प्रचंड आवडायचे. पण मागील वर्षी त्याला ल्युकेमिया झाला, या जीवघेण्या रोगाशी तो लढत होता. याचदरम्यान त्याचे मालक कार्लोस प्रेस्को यांनी मॉन्टीला अखेरचे डोंगरांवर नेण्याचा निर्णय घेतला.
श्वानाला त्यांनी एका चाकाच्या गाडीत बसविले, त्याला त्यांनी अजिबात चालू दिले नाही. या वाहनाला स्वतः खेचत इंग्लंडच्या पेन ये फॅन या साउथ वेल्समधील सर्वात उंच शिखरावर नेले. यापूर्वी कार्लोस अनेकदा श्वानासोबत येथे आले होते. ल्युकेमिया हा आजार लवकरच श्वानाचा जीव घेणार याची त्यांना जाणीव होती. म्हणूनच त्यांनी ही ट्रिप केली आहे.
या प्रवासादरम्यान अनेक अज्ञात लोकांनी विचारपूस केली. मॉन्टीवर प्रेमाचा वर्षाव केला. लोकांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेणे मॉन्टीला आवडते असे कार्लोस यांनी म्हटले आहे. मॉन्टी बाहेरून तंदुरुस्त दिसत असला तरीही कॅन्सर आतून त्याला पोखरत असल्याचे कार्लोस यांना माहित होते. मॉन्टीच्या स्नायूंना पूर्ण ऑक्सिजन मिळत नव्हता.
या ट्रिपच्या काही दिवसांनी मॉन्टीचा मृत्यू झाला आहे. कार्लोस त्याला स्वतःच्या बॅकपॅकमध्ये बांधून शिखरावर घेऊन गेले होते. दोघांची प्रेमळ छायाचित्रे प्रचंड व्हायरल झाली आहेत.