वृत्तसंस्था/ पॅरीस
चालू महिन्याच्या अखेरीस लंडनमध्ये होणाऱया एटीपी टूरवरील अंतिम स्पर्धेसाठी अर्जेंटिनाचा टेनिसपटू दियागो श्वार्ट्झमनला पात्रतेसाठी आणखी एका विजयाची जरूरी आहे. येथे सुरू असलेल्या पॅरीस मास्टर्स टेनिस स्पर्धेत श्वार्ट्झमनने फोकिनाचा पराभव करून पुढील फेरीत स्थान मिळविले.
गुरूवारी झालेल्या या स्पर्धेतील सामन्यात 6 व्या मानांकित श्वार्ट्झमनने फोकिनाचा तासभराच्या कालावधीत 6-1, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. या स्पर्धेत आणखी एक सामना जिंकल्यास श्वार्ट्झमनला एटीपी टूरवरील अंतिम स्पर्धेसाठी पहिल्यांदाच प्रवेशाची संधी मिळेल.