कर्ज काढून पाच हजारांची केली मदत
प्रतिनिधी/ बेळगाव
‘एकत्रित प्रयत्नांमुळे तरुणांवरील उपचार यशस्वी हे तरुण भारतमधील वृत्त वाचून राहुल बिदरभावीकर या रुग्णाचा मित्र त्याच्या मदतीसाठी धाऊन आला आणि त्याने कर्ज काढून राहुलला पाच हजारांची मदत केली. हे कर्ज कशासाठी, असे सोसायटीने विचारता ज्ञानेश्वर या मित्राने राहुलच्या परिस्थितीबद्दल कल्पना दिली. तेंव्हा सोसायटीने सुद्धा पाच हजार रुपयांची मदत केली.
गर्लगुंजी येथील राहुल बिदरभावीकर हा किडनी विकाराने त्रस्त आहे. ग्रामस्थ, डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांमुळे त्याच्यावर वेळेवर उपचार होवू शकले. मात्र अद्यापही त्याला उपचाराची गरज आहे. बुधवार दि. 13 रोजी तरुण भारतने प्रसिद्ध केलेले वृत्त राहुलचा मित्र ज्ञानेश्वर बेडरे याने वाचले आणि त्वरित त्याने सोसायटीमध्ये जावून कर्ज हवे असल्याचे सांगितले. कर्जाचे कारण समजताच सोसायटीच्या सेपेटरींनी अध्यक्षांशी संपर्क साधून त्यांना कल्पना दिली. रोजंदारीवर कामाला जावून सुद्धा मित्राच्या मदतीला उभे राहणाऱया ज्ञानेश्वरची तळमळ त्यांना जाणवली. त्यामुळे श्री महालक्ष्मी को-ऑप. पेडिट सोसायटी-रुमेवाडीतर्फे 10 हजारांची मदत केली. शिवाय सचिव लक्ष्मण पाटील यांनी वैयरिक्तरित्या अडीच हजारांची आर्थिक मदत केली. राहुलची परिस्थिती नाजूक असून तो कारखान्यात जावून कुटुंबाला हातभार लावत होता. मात्र त्याच्यावर अचानक हे संकट ओढवले. याबाबत फेसबुक प्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर, प्रशांत बिर्जे यांनी निधी संकलन केले. याबाबतचे वृत्त दिल्यामुळेच राहुलला मदत मिळू शकली. यासाठी त्यांनी तरुण भारतबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सोसायटीतर्फे राहुलचे भावोजी संतोष चौगुले यांच्याकडे मदत देण्यात आली.