कॅफेत शिरले पुराची पाणी, तरीही चालू ठेवला व्यवसाय
कोरोना महामारीमुळे रेस्टॉरंटचा व्यवसाय अद्याप तेजी पकडू शकलेला नाही. अशा स्थितीत थायलंडमध्ये आलेला पूर आणि अतिवृष्टीमुळे रेस्टॉरंटचालकांच्या अडचणी वाढल्या आहेत. पण थायलंडमध्ये एका नदीकाठावर असलेले रेस्टॉरंटमालकाने पूरस्थितीतही रेस्टॉरंट चालविण्याची एक अशी कल्पना शोधून काढली की त्याची चर्चा आता जगभरात होत आहे. खऱया अर्थाने त्याने संकटाला संधीत रुपांतर करण्याचे कसब दाखवून दिले आहे.
या रिव्हरसाइड रेस्टॉरंटच्या मालकाचे नाव टिटिपोर्न जुतिमानोन आहे. महामारीमुळे संकटाला तोंड देणारा आपला व्यवसाय बंद व्हावा असे त्यांना वाटते. पण चालू आठवडय़ात जाओ फ्राया नदीची पातळी वाढल्यावर त्यांना आशेचा एक किरण दिसून आला.
पुरात खाद्यपदार्थांचा आनंद
नदीच्या वाढत्या पातळीमुळे पाणी घर आणि दुकानांमध्ये शिरले. काही लोकांनी दुकाने बंद केली. पण टिटिपोर्न यांनी रेस्टॉरंट बंद करण्याऐवजी पुराच्या पाण्यामध्येच लोकांना खाद्यपदार्थ पुरवू लागले. पुराच्या पाण्यादरम्यान टेबल्स आणि खूर्ची ठेवण्यात आली. या पूरस्थितीदरम्यान रेस्टॉरंटमध्ये आता नौकाही येऊन थांबू लागल्या आहेत.
ग्राहकांना आवडतेय…
टिटिपोर्न यांचा हा एंटीक कॅफे उत्तर बँकॉकच्या नोंथबुरीमध्ये चाओ फ्राया नदीच्या काठावर आहे. ग्राहकांना नदीच्या पाण्यात बसणे आवडू लागले आहे. मी याचाच लाभ घेत रेस्टॉरंट चालू ठेवले. हा संकटाचा क्षण असला तरी एका विचाराने मी त्याला संधीत रुपांतरित केल्याचे टिटिपोर्न यांनी सांगितले.
सोशल मीडियावर व्हायरल या रेस्टॉरंटचे केवळ वातावरण नव्हे तर बारबेक्यू मीट आणि सूर्यास्ताचे दृश्य लोकांचे मन जिंकतेय. ग्राहकांची याला पसंती मिळत असल्याने मी स्वतःला सुदैवी मानत आहे. पूर आता माझ्यासाठी कुठलेच आव्हान नाही. ग्राहक येथे येऊन आनंदी होत असल्याचे टिटिपोर्न म्हणाले. तर सोशल मीडियावर रेस्टॉरंटची छायाचित्रे आणि चित्रफिती व्हायरल होत आहेत.