प्रमोद पाटील यांची नगरपालिकेकडे मागणी
प्रतिनिधी / कराड
शहरातील मिळकतींवर वार्षिक कर आकारणी करताना 2 टक्के शस्ती (व्याज) आकाराणी करण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे नागरिक आर्थिक संकटात असल्याने ही शास्ती माफ करण्यासाठी पालिकेने शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी दक्ष कराडकरचे प्रमुख प्रमोद पाटील यांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडे केली आहे. शहरात मार्च 2021 अखेर संकलित कराची वसुली नगरपालिका करत आहे. देशभर कोरोना संकटामुळे 24 मार्चला लॉक डाऊन सुरु झाला. तो जवळजवळ साडे तीन महिने होते. त्याचा परिणाम आर्थिक स्थितीवर पडला आहे. कराड शहरातील बरेच नागरिक आर्थिक संकटात सापडले. कोणाची नोकरी गेली कोणाचा व्यवसाय तोटय़ात गेला..उद्योगधंदे बंद पडले. लॉक डाऊनचा परिणाम आजही लोकांच्या आर्थिक जीवनावर जाणवतो. अशा स्थितीमध्ये कराड नगरपरिषद वार्षिक कर वसुली सुरु आहे.. शासन विविध विकासकामे, योजना या वसुलीमधूनच आलेल्या रकमेमधून पालिका करत असते. आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना दिलासा म्हणून कर जरी माफ करता आला नाही तरी निदान डिसेंबरनंतर कर भरताना नागरिकांना 2 टक्के शास्ती म्हणजे संपूर्ण कर रकमेला वार्षिक 2 टक्के व्याज लागते. किमान 2 टक्के शास्ती माफ करावे. याबाबत शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.