वृत्त संस्था/ ऍरेजेलोव्हेक (सर्बिया)
नागपूरचा 18 वर्षीय युवा बुद्धिबळपटू संकल्प गुप्ता याने येथे सुरू असलेल्या फिडेच्या स्वीस खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तिसरा आणि शेवटचा ग्रॅण्डमास्टर नॉर्म घेत ग्रॅण्डमाटर किताबावर शिक्कामोर्तब केला. संकल्प गुप्ता हा भारताचा 71 वा ग्रॅण्डमास्टर आहे.
ग्रॅण्डमास्टर किताब मिळविण्यासाठी तीन ग्रॅण्डमास्टर नॉर्मची आवश्यकता जरूरीची असते. संकल्प गुप्ताने 24 दिवसांच्या कालावधीत तीन विविध स्पर्धामध्ये आपला सहभाग दर्शवित ग्रॅण्डमास्टर किताब संपादन केला. सर्बियातील या स्पर्धेत संकल्प गुप्ताने 2500 इलो मानांकन गुणांची मर्यादा पार केली. भारताचा ज्येष्ठ बुद्धिबळपटू आणि माजी विश्वविजेता ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंदने तसेच अखिल भारतीय बुद्धिबळ फेडरेशनने संकल्प गुप्ताचे खास अभिनंदन केले आहे.