राखीव पोलीस दल तैनात : 50 दुचाकी जप्त : डीएसपी, तालुका आरोग्य अधिकाऱयांनी मांडले ठाण
प्रतिनिधी/ संकेश्वर
संकेश्वर येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण शहर सीलडाऊन करण्यात आले. सध्या पोलिसांकडून सीलडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत असून, नागरिकांकडून देखील त्यास प्रतिसाद मिळत आहे. विनाकारण फिरणाऱयांवर पोलिसांचा प्रसाद मिळत असून, 50 गाडय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने तालुका आरोग्याधिकारी तसेच डीएसपी शहरात तळ ठोकून असून, संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
सीलडाऊन केल्यानंतर शहराबरोबरच सर्वच उपनगरांमध्ये शुकशुकाट पसरला आहे. आरोग्य विभागाने कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह संपर्कात आलेल्या सर्वच व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवून दिले आहे. शिवाय आशा कार्यकर्त्यांकडून घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
दररोज सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत मागणीप्रमाणे ग्राहकांना जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा करण्याचे काम नियोजित दुकानदार करीत आहे. त्यानंतर †िदवसभर इस्पितळ वगळता सारेच व्यवहार शंभरटक्के बंद ठेवले जात आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील प्रत्येक भागावर ड्रोन पॅमेऱयाद्वारे नजर ठेवण्यात येत आहे.