प्रतिनिधी / सातारा :
‘मकर संक्रांत’ हा सण काही दिवसांवरच येवून ठेपल्याने कुंभारवाडय़ात, तसेच बाजारपेठेत खरेदीचे वातावरण पहायला मिळत आहे. संक्रांत सणासाठी लागणाऱया कुंभारवाडय़ातील मातीच्या संक्रांती आता हळूहळू बाजारपेठेत येवू लागल्या आहेत.
संक्रांतीसाठी लागणारे साहित्य शहरातील पोवईनाका, राजवाडा, मोळाचा ओढा, बॉम्बे रेस्टॉरंट या ठिकाणी दिसत असल्याने संक्रांतीची चाहूल लागली आहे. संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बाजारपेठा बहरून आल्या असून बाजारपेठेत जागोजागी हळद-कुंकू, सुपारी, बदाम, खारीक, काळे तीळ, पांढरे तीळ, खोबरे, खारीक, वेलची, हळकुंड तसेच तिळगुळ आदी साहित्य विक्रीसाठी आले आहे. रस्त्यावर दुकाने मांडण्यात आली आहेत. या साहित्यांना आता मागणी वाढू लागली असून ग्रामीण भागातील नागरिक सणाच्या अगोदरच या साहित्यांची खरेदी करत आहेत. तसेच दुकांनामधून बाजरी, तिळगुळ, गुळ, डाळ आदींचीही खरेदी केली जात आहे. काही दिवसांवर संक्रांत आल्याने कुंभारवाडय़ातही लगबग पहायला पहायला मिळतःःआहे.