मडगाव पालिकेतील प्रकार, रांगेत ताटकळत उभे राहून परतण्याचा प्रसंग
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेने शुक्रवारपासून सुरू झालेल्या 2022-23 आर्थिक वर्षासाठीच्या नोंदी संगणकांत केलेल्या नसल्याने शुक्रवारी सकाळच्या सत्रात घरपट्टी व अन्य करवसुली करणे शक्मय झाले नाही. त्यामुळे करभरणा करण्यासाठी सकाळपासून रांगेत उभ्या राहिलेल्या करदात्यांना त्रास सहन करावा लागला.
पालिकेने ‘एनआयसी’ला यासंदर्भात आवश्यक माहिती पुरवून त्याचे फिडिंग आर्थिक वर्ष सुरू होण्याआधीच संगणकांत करणे आवश्यक होते. परंतु तसे न केल्याने पालिकेला स्वतः येऊन करभरणा करणाऱया नागरिकांकडून करवसुली करता आली नाही. त्यातच करदात्यांना रांगेत तासन्तास उभे राहावे लागले. यात बहुतेक ज्ये÷ांचा समावेश होता. त्यांची अधिकच दमछाक झाली.
मडगाव पालिकेचे कित्येक निर्णय अलीकडे वादग्रस्त ठरलेले असून वसुलीसाठी आवश्यक प्रक्रिया आर्थिक वर्ष सुरू होण्याच्या अगोदर पूर्ण करण्याचा विसर पालिकेला पडल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. कित्येकांनी यावेळी पालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. कर अधिकारी अभय राणे यांनी एनआयसीकडून फिडिंग झाल्यानंतर सगळे काही जाग्यावर पडणार असल्याचे सांगून संतप्त करदात्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी सदर फिडिंग पूर्ण झाल्यानंतर करभरणा प्रक्रिया हाती घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.