डॉ. प्रदीप देशपांडे यांचे संशोधन : डोळ्यांच्या नंबरवर आधारित संगणक खेळ -जगातील पहिले शास्त्रज्ञ डॉक्टर रत्नागिरीचे
प्रतिनिधी / रत्नागिरी
योग्य चष्मा लावूनही चांगल्या प्रकारे दिसत नाही, अशावेळी डॉक्टर आळशी डोळे म्हणजे ’ऍम्लीओपीया’चे निदान करतात़ यावर औषधे, इंजेक्शने उपयोगी ठरत नाहीत़ विशिष्ट प्रकारचा डोळ्यांचा व्यायाम मात्र हा विकार बरा करू शकत़ो डोळ्यांच्या नंबरच्या अनुरूप विशिष्ट व्यायाम होण्यासाठी जगातील पहिले सॉफ्टवेअर रत्नागिरीतील एका डॉक्टरांनी बनवले आह़े संगणक किंवा मोबाईलवर खेळ खेळताना होणाऱया डोळ्यांच्या व्यायामातून डोळे बरे केले जाऊ शकतात़, असे ड़ॉ प्रदीप देशपांडे यांनी आपल्या संशोधनातून पुढे आणले आह़े
रत्नागिरी येथे नव्यानेच इन्फिगो आय हॉस्पीटल सुरू झाले आह़े आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध सादर करणारे ड़ॉ प्रदीप देशपांडे कार्यरत याच हॉस्पीटलमध्ये कार्यरत आहेत़ जागतिक दृष्टीदिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आळशी डोळे या विकाराबद्दल माहिती दिल़ी ते म्हणाले की या विकाराची फारशी माहिती लोकांना नाह़ी जगात 4 टक्केपर्यंत दृष्टी कमी असल्याचे कारण ‘आळशी डोळे’ आह़े भारतात जेथे वैद्यकीय सेवा अपुऱया आहेत़ तेथे हे प्रमाण 8 टक्केपर्यंत आह़े चष्मा लावूनही योग्य प्रकारे दिसत नाह़ी. डोळे दिसायला चांगले, पण दृष्टीत दोष आह़े अशा बाबतीत आळशी डोळ्यांचे निदान असू शकत़े
अनुवंशिकतेमुळे चष्मा असू शकत़ो अनेकांना तो लहानपणापासून असत़ो काही पालक आपल्या मुलांच्या डोळ्यांच्या तपासणाकडे दुर्लक्ष करतात. त्यातील काही मुलांना आळशी डोळे हा विकार असत़ो अशा मुलांच्या शालेय प्रगतीवर, विपरित परिणाम होत़ो मुलाला चष्मा असला तरी दिसत नाह़ी अशावेळी योग्य उपचार दिले पाहिजेत़ चष्मा नंबर असताना तो नियमित न वापरणे, डोळे तिरळे असणे, जन्मतः मोतीबिंदू असणे अशी अनेक कारणे आळशी डोळे विकारासाठी असतात़ डोळ्यात प्रकाश जात नाही म्हणून त्या व्यक्तीला दिसत नाह़ी
आळशी डोळय़ावरील पहिल्या प्रबंधाला फस्ट पेपर ऍवॉर्ड
ड़ॉ देशपांडे म्हणाले, आळशी डोळे विकार टाळण्यासाठी लवकरात-लवकर तपासणी व योग्य नंबरचा चष्मा दिला पाहिज़े तिरळेपणा घालवण्यासाठी शस्त्रक्रिया केली पाहिज़े आजवर एक डोळा बंद करून विशिष्ट वेळ दुसरा डोळा कामात ठेवणे, अशी एकमेव उपचार पद्धती होत़ी आजच्या युगात एका डोळ्याला पॅच लावणे, मुलांना पसंत नसत़े त्यासाठी मुलांचे सहकार्य मिळणे अवघड ठरत़े आळशी डोळा या विषयावर जगातील पहिला प्रबंध आपल्याला सादर करता आल़ा त्याबद्दल जागतिक स्तरावर फस्ट पेपर ऍवॉर्डही मिळाल़े
त्यांनी पुढे सांगितले, संगणकावरील खेळ डोळ्यांच्या सिलेंड्रीकल नंबरशी सुसंगत तयार करण्यात आले आहेत़ अशा प्रकारचे खेळ जगात सर्वप्रथम तयार करण्यात आपल्याला यश आले आह़े आता ऍक्सीस गेम असलेले प्रदीप टॅबही तयार करण्यात आले आहेत. संगणकीय खेळांच्या आधारे डोळयांना व्यायाम देणारे सॉफ्टवेअर बनवल्याने देशभरातील प्रसिद्ध शंकर नेत्रालयचे उपाध्यक्ष ड़ॉ ट़ी एस़ सुरेंद्रन, मुंबईचे ड़ॉ मस्केती, जयपुरचे ड़ॉ अग्रवाल आदींनी या प्रयत्नांचे कौतुक केले. या टॅबच्या आधारे लहानात लहान मुलांचे डेळे तपासता येतात़ 1 वर्षाच्या आतील मुलांचे डोळेही तपासणे यामुळे शक्य आह़े
डॉ. देशपांडेंकडून 1 लाखाहून जास्त शस्त्रक्रिया
ड़ॉ प्रदीप देशपांडे यांनी मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळे डोळे अशा 1 लाखाहून अधिक शस्त्रक्रिया गेल्या 45 वर्षात केल्या आहेत़ सध्या ते रत्नागिरीतील प्रसिद्ध इन्फिगो आय हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत़ ते म्हणाले, संगणकीय खेळांमध्ये आयुर्वेदातील त्राटक व अन्य दृष्टी व्यायामांचा समावेश करण्यात आला आह़े जगभरात 3 ते 4 टक्के मुले सदोष दृष्टीमुळे नोकरी निवड प्रक्रियेतून बाद होतात़ त्यांना अशा व्यायामाव्दारे दृष्टी सुधारणे शक्य आह़े 2 वर्षाच्या आतील मुलांना संगणक, गॅजेट पाहण्यास परवानगी नाह़ी त्यानंतरच्या मुलांना एकावेळी केवळ अर्धा तास स्क्रीनटाईम वापरता येईल़ त्यानंतर डोळ्यांना 15 ते 30 मिनिटे विश्रांती दिली पाहिज़े