बेळगाव : संगमेश्वरनगर येथे दिवाळी निमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे आयोजन दिनेश पाटील, सुरेश पाटील, राजाराम हंगीरकर आणि राखी अनगोळकर, अंजली जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. स्पर्धेत मोठय़ा प्रमाणात स्पर्धेकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ हेल्प फॉर निडीच्या सदस्या माधुरी जाधव (पाटील) यांच्या हस्ते करण्यात आला.
स्पर्धेत अनुक्रमे पूनम हंगिरकर, ज्योती पाटील, स्नेहा पाटील यांनी क्रमांक मिळविला. प्रारंभी अंजली जाधव, भारती हंगिरकर, स्वाती पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन दिनेश पाटील यांनी केले. राखी अनगोळकर यांनी आभार मानले.